
विशाल विमल मोढवे दिग्दर्शित ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट २ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. ‘श्रीदेवी प्रसन्न’ या चित्रपटात सई ताम्हणकर व सिद्धार्थ चांदेकर मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार असून सुलभा आर्या या सईच्या फिल्मी आज्जीच्या भूमिकेत दिसणार आहेत त्याचबरोबर सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, संजय मोने, वंदना सरदेसाई, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, रमाकांत डायमा, शुभांगी गोखले, पाहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत.








