
अभिनेत्री स्पृहा जोशी हिने ‘दे धमाल’ या मालिकेतून आपल्या अभिनय कारकीर्दीचा श्रीगणेशा केला होता. तर, २००४मध्ये तिने ‘माय बाप’ नावाच्या एका मराठी चित्रपटातही काम केलं होतं. ‘माय बाप’ या चित्रपटात स्पृहाने शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या एका तरुण मुलीची भूमिका केली होती. मात्र, या चित्रपटानंतर ब्रेक घेऊन तिने आपलं शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रामनारायण रुईया कॉलेजमध्ये पदवीचं शिक्षण घेत असताना तिने कॉलेजच्या नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. कॉलेज जीवनात तिने ‘ग म भ न’, ‘युग्मक’, ‘एक और मय्यत’, ‘कोई ऐसा’, ‘कॅनवास’, ‘संत’, ‘एक अशी व्यक्ती’ आणि ‘अनन्या’ अशा नाटकांमध्येही काम केलं.






