
Spanish Woman Gang Raped : भारतामध्ये पर्यटनासाठी आलेल्या बाईकस्वार स्पॅनिश पती-पत्नी यांना अत्यंत दुर्दैवी प्रसंगाला सामोरे जावे लागले. या स्पॅनिश महिलेवर झारखंडनजीक डुमका येथे सामूहिक बलात्कार केल्याने देशभरात मोठी खळबळ उडाली आहे. मोटारसायकलवर पर्यटन करण्यासाठी आलेल्या स्पॅनिश पती-पत्नीने झारखंडच्या डुमका बाजारानजीक तंबू लावला होता. या तंबूतच स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतात मोटारसायकलवर पर्यटन करण्यासाठी निघालेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्काराने देशभरातील बाईकस्वारांनी या घटनेचा निषेध केला आहे.
एका निर्जन स्थळावर तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम
बिहारच्या भागलपूर येथे जात असताना त्यांनी झारखंडच्या डुमकी मार्केटनजीक एका निर्जन स्थळावर तंबू ठोकून रात्रीचा मुक्काम करण्याचा निर्णय घेतला होता. या दरम्यान पीडितेवर अत्याचार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याला मारहाणदेखील झाली. या घटनेप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे.
#WATCH | Dumka, Jharkhand: On the Spanish woman’s alleged gangrape case, SP Pitamber Singh Kherwar says, “As the victims were speaking in Spanish English which we were not able to understand, we took them to hospital where it was discovered that it is a case of gangrape of the… pic.twitter.com/n0OtRspMbe
— ANI (@ANI) March 2, 2024
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्यावर काही स्थानिक टोळक्याची नजर पडली. त्यांनी स्पॅनिश जोडप्याची छेडछाड केली आणि त्यानंतर महिलेवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर ३५ वर्षीय पीडित महिलेने गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला थांबवून तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती दिली. शुक्रवारी (दि. १ मार्च) रात्री १० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी पीडित महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
विदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती
डुमका जिल्ह्याचे शल्यचिकित्सक बी. पी. सिंह यांनी एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, एका विदेशी महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची माहिती मला मिळाली आहे. त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यास मला सांगितले गेले. पोलिसांनी पीडितेचा जबाब नोंदविला असून, एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीनुसार सदर महिलेचे वय ३५ असल्याचे कळते.
Dear Jharkhand Tourism, @VisitJharkhand
Earlier I refused your offer to promote Jharkhand tourism just because you people don’t deserve it. Firstly ask your government and @JharkhandPolice to maintain the law and order in Jharkhand state.
My Spanish rider friend has been… pic.twitter.com/sMZ1XIEdkR
— Kanchan Ugursandi 🇮🇳 (@BikerGirlkancha) March 2, 2024










