
हॉलिवूड अभिनेत्री सोफी टर्नर आणि जोई जोनास या दोघांनी २०१६मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. यानंतर २०१७मध्ये त्यांची एंगेजमेंट झाली आणि त्यानंतर २०१९मध्ये दोघांनी लास वेगासमध्ये लग्न केले. यानंतर दोघांनी २०२०मध्ये पहिल्या मुलाचे आणि नंतर २०२२मध्ये दुसऱ्या मुलाचे स्वागत केले. दोघांच्या प्रोफेशनल करिअरबद्दल बोलायचे झाले, तर जोई आणि सोफी त्यांच्या करिअरमध्ये खूप सक्रिय आहेत. सोफी टर्नर ‘गेम्स ऑफ थ्रोन्स’सारख्या वेब सीरिजसाठी प्रसिद्ध आहे. तर, जोईने आपल्या दोन भावांसह नुकतीच एक म्युझिकल टूर पूर्ण केली आहे. जोई जोनास हा निक जोनासचा मोठा भाऊ आणि प्रियांका चोप्राचा दीर आहे.








