
मात्र, अभिनेता सूरज पांचोलीने आपल्या प्रेयसीबद्दल किंवा तिच्या नावाबद्दल काहीही खुलासा केला नाही. या गोष्टी त्याने गुलदस्त्यात ठेवल्या आहेत. मात्र, त्याच्या आयुष्यातील ही खास व्यक्ती कोण आहे, असे त्याला विचारले असता त्याने ही माहिती सांगण्यास स्पष्ट नकार देत, ओळख उघड करू शकत नसल्याचे म्हटले. ‘आता मला माझे हे नाते अतिशय खाजगी ठेवायचे आहे. कारण, माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत आधी कधीही चांगल्या गोष्टी सांगितल्या गेल्या नाहीत’, असे तो म्हणाला. अभिनेत्री जिया खान हिने आत्महत्या करून आपले आयुष्य संपवल्याने बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. या प्रकरणात सूरज पांचोलीवर अनेक आरोप लावण्यात आले होते.








