
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज विष्णू चंदनशिवे (वय, ४२) असे हत्या झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. चंदनशिवे हे सांगोला तालुक्यातील वासूद- केदारवाडी येथे वास्तव्यास होते. ते बुधवारी रात्री जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी घराजवळ केदारवाडी रोडवर गेले. मात्र, या ठिकाणी आधीपासूनच दबा धरून बसलेल्या अज्ञात मारेकऱ्यांनी पाठीमागून जाऊन त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्रांनी वार केले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला. रात्री शतपावली करण्यासाठी गेलेले चंदनशिवे दिवस उजडला तरी घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. त्यावेळी चंदनशिवे यांचा मृतदेह वासूद- केदारवाडी रोडनजीक आढळून आला.





