Sohail Khan Birthday: सीमाशी लग्न करण्यासाठी सोहेल खानने मौलवींनाच घरी पळवून आणले! वाचा किस्सा…

0
14
Sohail Khan Birthday: सीमाशी लग्न करण्यासाठी सोहेल खानने मौलवींनाच घरी पळवून आणले! वाचा किस्सा…


Happy Birthday Sohail Khan: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा भाऊ आणि अभिनेता सोहेल खान आज (२० डिसेंबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. सोहेल खानचं चित्रपट करिअर फारसं काही चाललं नाही. मात्र, वैयक्तिक आयुष्यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. सोहेल खान याने सीमा सचदेव हिच्याशी लग्नगाठ बांधली होती. मात्र, लग्नाच्या २४ वर्षांनंतर घटस्फोट घेत त्यांनी सगळ्यांनाच धक्का दिला होता. सीमा आणि सोहेल यांची लव्हस्टोरी देखील खूप खास होती. कामाच्या शोधात मुंबईत आलेल्या सीमा आणि सोहेल यांची पहिली भेट एका सेटवर झाली होती. पहिल्याच नजरेत सोहेल सीमाच्या प्रेमात पडला होता. सीमाशी लग्न करण्यासाठी सोहेलने थेट मौलवींनाच पळवून घरी आणले होते.



Source link