
श्रेयाने तिच्या विनोदबुद्धीने जरी प्रेक्षकांचे मन जिंकले असले तरी ‘समुद्र’ या नाटकात ती गंभीर भूमिकेत दिसली. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे नेहमीच कौतुक केले जाते. आजही श्रेयाचे लाखो चाहते आहेत. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सतत चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिचे व्हिडीओ आणि फोटो कायम सर्वांचे लक्ष वेधून घेतात.








