
Shraddha Kapoor: बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या आगामी ‘जिगरा’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकताच आलियाच्या ‘जिगरा’चा टीझर-ट्रेलर रिलीज झाला. या चित्रपटात आलियासोबत ‘द आर्चीज’ चित्रपटातील अभिनेता वेदांग रैना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. दरम्यान, या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांची माफी मागावी लागली आहे. आता नेमकं असं काय झालं आहे ज्यामुळे माफी मागावी लागली हे जाणून घेण्यासाठी नेटकरी आतुर आहेत.








