
‘शिवबाचं नाव’ या गाण्याच्या दिग्दर्शनाची व छायाचित्रणाची दुहेरी जबाबदारी अभिजीत दाणी याने उत्तमरीत्या पेलवली आहे. या गाण्यात महाराष्ट्रातील तरुण प्रेक्षकांचे आवडते कलाकार विशाल फाले, निक शिंदे, रितेश कांबळे, तृप्ती राणे आणि वैष्णवी पाटील यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. ‘शिवबाचं गाणं’ या गाण्यात छत्रपती महाराजांच्या भूमिकेत लोकप्रिय मराठमोळा अभिनेता विशाल निकम झळकला आहे. तर, महाराणी सईबाईंच्या भूमिकेतून अनुष्का सोलवट हिने मराठी कला क्षेत्रात पदार्पण केले आहे, तर सुभेदार म्हणून अविनाश सोलवट यांनी मुख्य भूमिका केली आहे. या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन चेतन महाजन आणि चेतन शिगवण यांनी केले आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत असलेलं पाहायला मिळत आहे.








