
निमिश कुलकर्णी देखील अभिनेता असून, शिवाली परबसोबत तो देखील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमध्ये झळकत आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील काही स्कीट्समध्ये शिवाली आणि निमिश नवरा-बायकोचं पात्र साकारतात. त्यामुळे आता खऱ्या आयुष्यात देखील हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे. मात्र, त्यांचा हा फोटो केवळ एक गंमत असल्याचे देखील म्हटले जात आहे. तर, यावर दोघांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.






