
‘शार्क टँक इंडिया सीझन ३’मध्ये एका नवीन स्टार्टअपचे संस्थापक ‘शार्क’ म्हणून एन्ट्री करताना दिसणार आहे. ‘शार्क टँक इंडिया’मधील हा नवा शार्क म्हणजे ‘ओयो’चा संस्थापक रितेश अग्रवाल आहे. रितेश अग्रवाल यांनी स्वतः देखील याची घोषणा केली आहे. शार्क टँक इंडियाच्या सगळ्या सोशल मीडिया हँडल आणि प्लॅटफॉर्मवर आता रितेश अग्रवाल यांच्या एन्ट्रीची चर्चा रंगली आहे. ‘शार्क टँक इंडिया’च्या इन्स्टाग्राम हँडलवर यासंबंधीचा एक खास व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये रितेश अग्रवाल ‘शार्क टँक इंडिया’च्या सेटवर सर्व शार्क्ससोबत बसलेला दिसला आहे.








