
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ईव्हीएम वादाच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीत गेले होते. या गावात ईव्हीएम विरोधात एक मॉक-पोल आयोजित केली होती. त्यामध्ये लोकांना बॅलेटच्या माध्यमातून मतदान करायचं होतं. याच्या माध्यमातून त्यांना दाखवायचं होतं की, शरद पवार गटाच्या उमेदवाराला ईव्हीएमच्या माध्यमातून मिळालेल्या मतांहून अधिक मते मिळू शकतात. मात्र पोलिसांनी ग्रामस्थांना रोखले होते आणि अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले होते.






