
Madha Lok Sabha Election : राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडल्यावर आता पक्ष वाचवण्यासाठी तसेच आपले अस्तीत्व सिद्ध करण्यासाठी स्वत: शरद पवार हे मैदानात उतरले आहेत. त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला असून पुन्हा पक्ष उभारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. दरम्यान, आता पुन्हा ते लोकसभा निवडणूक लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. या साठी करकर्त्यांनी त्यांना आग्रह केला असून त्यांचा मतदार संघ देखील ठरला असल्याची चर्चा आहे. शरद पवार हे माढा मधून लढण्यासाठी चाचपणी सुरू आहे.






