
फलटणःफलटण तालुक्यातील वाहन चालकांची गैरसोय दूर करण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून फलटण येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्यात आले असून यांच्या शुभारंभ शुक्रवार दि . १५ मार्च रोजी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा हस्ते होणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी सातारा विनोद चव्हाण यांनी दिली
फलटण येथील वाहन चालकांना लायसन्स , पासिंग आदी कामासाठी सातारा जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत होते . यामुळे वाहन चालकांना याच्या नाहक त्रास सहन करावा लागत होता, यामध्ये आर्थिक नुकसान होवून, वेळ ही वाया जात होता . यामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी महाराष्ट्र शासनाकडे वेळोवळी पाठपुरावा करूनमागील आठवड्यात स्वतंत्र परिवहन कार्यालय मंजूर केले होते .
फलटण साठी MH 53 हा नंबर मिळाला आहे. केवळ मंजुरीवर न थांबता प्रत्यक्ष जागा बघून ते तातडीने सुरू करण्याचा आग्रह अधिकाऱ्याकडे धरून त्याचा उद्घाटन कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला आहे. शिंगणापूर रोडला जुने लेडीज हॉस्टेल इमारतीत हे कार्यालय सुरू होणार असून त्याचे उद्घाटन शुक्र दि 15 रोजी दुपारी 1 वाजता पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार श्रीनिवास पाटील खासदार भोसले, खासदार श्रीनिवास पाटील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शशिकांत शिंदे आमदार जयंत आसगावकर, आमदार महादेव जानकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोस, ले आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार मकरंद पाटील आमदार दीपक चव्हाण, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक सातारा समीर शेख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे








