
ऊन, पाऊस, थंडी सगळं विसरून चाहते ‘मन्नत’ शाहरुखची वाट पाहत उभे असतात. किंग खान देखील ‘मन्नत’च्या बाल्कनीत येऊन त्याच्या चाहत्यांची भेट घेतो. नुकताच शाहरुख खान चाहत्यांना सरप्राईज देण्यासाठी बाल्कनीत आला होता. मात्र यावेळी चाहत्यांनीच शाहरुखला सरप्राईज दिले.कडक उन्हात शाहरुखच्या बंगल्याबाहेर हजारो चाहते जमले होते. यादरम्यान एक अनोखा विक्रम झाला. १८जून रोजी शाहरुखच्या ‘पठाण’ या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होणार आहे. या निमित्ताने चॅनलचा लोगो असलेले टी-शर्ट परिधान केलेल्या सुमारे ३०० चाहत्यांनी एकाचवेळी शाहरुख खानची आयकॉनिक पोज करत गिनीज रेकॉर्ड नोंदवला आहे.






