Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग शाहरुख खानने ‘या’ मॉडेलसाठी स्वतःच्या हाताने बनवला पिझ्झा! पोस्ट होतेय व्हायरल…

0
19
Shah Rukh Khan: बॉलिवूड किंग शाहरुख खानने ‘या’ मॉडेलसाठी स्वतःच्या हाताने बनवला पिझ्झा! पोस्ट होतेय व्हायरल…


नवप्रीत कौरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती शाहरुख खानसोबत दिसत आहे. नवप्रीतने या फोटोंसोबत एक लांबलचक कॅप्शन लिहून ‘मन्नत’मध्ये आपली कशी काळजी घेतली गेली हे सांगितले आहे. नवप्रीतने लिहिले की, ‘मी स्वतःला हे पोस्ट न करण्याचे वचन दिले होते. परंतु, ही आठवण खूप मौल्यवान आहे, जी मी केवळ स्वतःजवळ ठेवू शकत नाही. मन्नत येथे घालवलेल्या या माझ्या आयुष्यातील खास दिवसासाठी मी स्वतःला धन्य समजते. किंग शाहरुख खानने स्वतःच्या हातांनी माझ्यासाठी पिझ्झा बनवला होता.’



Source link