
बॉलिवूड किंग खान शाहरुखचा ‘डंकी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाकडून प्रेक्षकांना पुन्हा एकदा नव्या रेकॉर्ड्सची आशा आहे. २०२३ हे वर्ष शाहरुख खानसाठी खूपच खास ठरले आहे. या वर्षात शाहरुख खान याचे रिलीज झालेले ‘पठान’ आणि ‘जवान’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले होते. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख खान शिर्डीतील साई बाबांच्या दर्शनासाठी पोहोचला आहे.







