Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला आलेल्या चाहत्यांचे मोबाईल लंपास!

0
22
Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करायला आलेल्या चाहत्यांचे मोबाईल लंपास!


‘बॉलिवूड किंग’ शाहरुख खानचा यंदाचा वाढदिवस खूप खास होता. अभिनेत्याने त्याचा वाढदिवस एका खास पद्धतीने साजरा केला आहे. किंग खानच्या प्रत्येक अपडेटची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. शाहरुख खानने या वर्षी त्याच्या ‘जवान’ आणि ‘पठाण’ या धमाकेदार चित्रपटांनी अनेक रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. इतकेच नाही, तर आता चाहते किंग खानच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचवेळी, शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डंकी’ची ‘डंकी ड्रॉप १’ ही पहिली झलक रिलीज झाली आहे. चित्रपटाचा हा टीझर चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यामुळे आता चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. शाहरुख खानचा हा चित्रपट काय कमाल करतो आणि कोणते रेकॉर्ड मोडीत काढतो, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.



Source link