
‘द आर्चिज’ हा त्याच नावाच्या लोकप्रिय अमेरिकन कॉमिक बुकमधील पात्रांवर आधारित अॅक्शन आणि म्युझिकल चित्रपट आहे. झोया अख्तरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचा टीझर देखील शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुम्ही जुन्या वेळेत परत जाण्यासाठी तयार आहात का? ‘द आर्चिज’मध्ये आपले स्वागत आहे.’ ‘द आर्चिज’चा टीझर पॉप कल्चरची आठवण करून देणारा आहे. मात्र, अद्याप या चित्रपटाची रिलीज डेट समोर आलेली नाही.







