SC to Ajit Pawar : शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरू नका; सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले!

0
16
SC to Ajit Pawar : शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरू नका; सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना फटकारले!


supreme court to Ajit pawar Group : अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये फुट पडली. राष्ट्रवादी कॉँग्रेस विभागली जाऊन अजित पवार गट आणि शरद पवार गट तयार झाले. दरम्यान, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे पक्ष नाव आणि घडयाळ हे चिन्ह अजित पवार गटाला बहाल केले तर शरद पवार गटाला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉँग्रेसहे नाव देत तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल केले. या विरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. अजित पवार गट हा शरद पवार यांचे नाव नाव आणि फोटो वापरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यावरून कोर्टाने अजित पवार यांना खडसावले असून शरद पवार यांचे नाव आणि फोटो वापरण्यास मनाई करत फटकारले आहे.  शरद पवार गटासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.



Source link