Sayaji Shinde On NCP Merger: दादांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केलेली?सयाजी शिंदे म्हणाले..
अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर दावे होऊ लागले आहेत… शरद पवारांच्या गटाकडून दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत.. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अद्यापही प्रतिक्रिया आल्या नव्हत्या . आता राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय… महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि अजित पवारांचं स्वप्न पूर्ण करावं, असं वक्तव्यही सयाजी शिंदे यांनी केलंय… सोबतच विलिनीकरणावर चर्चा झाली होती, असा दावाही त्यांनी केलाय… दरम्यान आज सयाजी शिंदे यांनी शरद पवारांची सांत्वनपर भेटही घेतलीे..
इतर महत्वाच्या बातम्या –
राष्ट्रीय स्वंयसेवक संघामुळेच भाजपला अच्छे दिन… आमच्या भूमिकेवर चालणाऱ्यांचा फायदा होतो, मोहन भागवतांचं वक्तव्य….
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्नचाच गौरव होईल, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मुंबईतील व्याख्यानात प्रतिपादन…
अजितदादांच्या विमानात वैमानिकांना संमोहित करून अपघात घडवून आणला का? व्हीएसआर कंपनीवर आमदार अमोल मिटकरींना संशय… तर आमदारकीची टर्म संपत असल्यानं मिटकरी अस्वस्थ, लक्ष्मण हाकेंचा पलटवार..
महाराष्ट्रच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं, सयाजी शिंदेंची भूमिका, तर दोन्ही राष्ट्रवादीबाबत पवार कुटुंबीय निर्णय घेणार, बजरंग सोनावणेंनी केलं स्पष्ट…
विधानसभा, राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीत मविआमध्ये एकमेकांना मदत करावीच लागेल, उद्धव ठाकरेंनी पुन्हा विधानपरिषदेवर जावं, अशी विनंती केलीय, संजय राऊतांचं वक्तव्य.








