Satyashodhak Poster Out: मोठ्या पडद्यावर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार महात्मा ज्योतिराव फुले!

0
14
Satyashodhak Poster Out: मोठ्या पडद्यावर ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता साकारणार महात्मा ज्योतिराव फुले!


या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करून, चित्रपटातील संदीप कुलकर्णी यांचा फर्स्ट लूक प्रेक्षकांना दाखवण्यात आला आहे. काहीच दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. टीझर रिलीजनंतर या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांची भूमिका नक्की कोणता अभिनेता साकारणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. प्रेक्षकांची हीच उत्सुकता आता फारकाळ न ताणता अखेर अभिनेत्याची पहिली झलक प्रेक्षकांना दाखवण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ५ जानेवारी २०२४ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



Source link