
कराडच्या एअरपोर्टवर मुंबईच्या दमानिया एअरवेजच्या अॅम्बिसिअन्स फ्लाईग क्लबने आठ महिन्यांपूर्वी वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात २० शिकाऊ वैमानिकांची पहिली बॅच प्रशिक्षण घेत आहे. सध्या वैयक्तिक ट्रेनिंग (सोलो ट्रेनिंग) दिले जात आहे. आज नेहमीप्रमाणे प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेत असताना एका विमानाचा अपघात झाला. धावपट्टीवरुन हे फोर सीटर विमान पॉवर वाढल्याने हवेत उडाले. त्यानंतर काही क्षणातच ते धावपट्टीवरील एका बाजुच्या संरक्षक भिंतीवर धडकले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींसह अधिकारी व सुरक्षारक्षकांनी धाव घेत प्रशिक्षणार्थी वैमानिकाला विमानातून बाहेर काढले.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघातापूर्वी विमान हवेत हेलकावे खात होते. त्यानंतर खाली येत विमान भिंतीवर आदळले.





