<p> <br />साताऱ्यातील फलटण येथील कुरवली खुर्द येथे आई आणि मुलीला मारहाण केल्याची घटना समोर आलीये. रविवारी सायंकाळी ही घटना घडलीये. गावात आमचे कपडे काढून आम्हाला मारहाण केली असा आरोप या महिलेने आणि मुलीने केलाय. शाळकरी मुलींच्या किरकोळ भांडणातून मारहाण केल्याच या दोघींचे म्हणणे आहे. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले असता आमची तक्रार घेतली नसल्याचही या महिलेने सांगितलय.</p>
Source link







