
मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील यवतेश्वर घाटात होंडा सिटी आणि क्रेटा यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघात एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर, ४ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली. जखमींना साताऱ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. गायत्री समीर आहेरराव असे या अपघात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे.




