<p>पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवत असल्याच्या आरोपाखाली साताऱ्यातील अभिजीत जंबुरेला ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्कफोर्सनं ताब्यात घेतलंय.. अभिजीत हा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करत होता. यावेळी त्याची ओळख एका दानीश सय्यद या मुलाबरोबर झाली. आणि याच दानीश सय्यदने पाकिस्तानमधील खुर्रम अब्दुल हमीदशी त्याची ओळख करून दिली. यानंतर अभिजीत जंबुरे हा पाकिस्तानातील आणि नायजेरिया मधील दहा नागरिकांच्या संपर्कात आला. तर संपर्कात आलेल्यांपैकी अनेक लोक हे पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेशी संलग्न असल्याचं समोर आलंय,. तसंच त्याच्या खात्यात ही पाकिस्तानमधून पैसे आल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालं आहे. दरम्यान सदर प्रकरणात चौकशीसाठी ओडिशा पोलिसांनी अभिजीत जंबुरेला ताब्यात घेतलंय. </p>
<p> </p>
<p> </p>
Source link








