SaReGaMaPa Li’l Champs: गाणे असे की एकत्र येतील सारे…‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या नव्या पर्वाची घोषणा!

0
16
SaReGaMaPa Li’l Champs: गाणे असे की एकत्र येतील सारे…‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’च्या नव्या पर्वाची घोषणा!


महाराष्ट्रातील नव्या दमाच्या गायकांना ओळख देण्याचं खरं काम जर कोणी केले असेल, तर ते ‘सारेगमप’ या कार्यक्रमाने… गेली १७ वर्ष आणि तब्बल १५ यशस्वी पर्व आणि भरभरून प्रेम मिळालेला एकमेव कार्यक्रम म्हणजे झी मराठीचा ‘सा रे ग म प’. या मंचाने अनेक उत्तमोत्तम गायक/गायिका महाराष्ट्राला आणि चित्रपट सृष्टीला दिल्या आहेत. मराठी संगीत क्षेत्रातही ‘सारेगमप’चं नाव नेहेमीच आदराने घेतलं गेलं आहे. ‘सारेगमप’च्या प्रवासात अनेक पर्व झाली. त्यातही ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ हे पर्व तुफान गाजलं. पल्लवी जोशीचे खुमासदार सूत्रसंचालन आणि रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या पंचरत्नांच्या सुमधुर आवाजाने सगळ्यांनाच भुरळ घातली.



Source link