
‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत उमाने ओवी आणि कुटुंब यात ती कुठल्याही कर्तव्यात कमी पडणार नाही, असं रघुनाथला सांगितलं आहे. आपल्याला न सांगताच उमा ओवीला खोत कुटुंबात कायमचं घेऊन आली ही गोष्ट रघुनाथ रावांच्या मनाला लागली आहे. उमाचं हे वागणं खोतांना अजिबातच पटलेलं नाही. उमा ही नात्याने ओवीची मावशी असल्याने, ती ओवीला आपल्या घरी कायमची घेऊन आली आहे. तर,दुसरीकडे संध्याची कोणतीही आठवण घरात घेऊन येऊ नको, अशी तंबी देऊनच खोतांनी तिला संध्याला भेटण्याची परवानगी दिली होती.






