
ओवीसाठी उमाला रडताना पाहून श्रीनू तिला विचारणार आहे. ‘तो स्पीकरच तर होता, जळू द्यायचा. त्यासाठी हात का भरून घ्यायचा?’, असं श्रीनू म्हणतो. तेव्हा उमा त्याला तो स्पीकर म्हणजे ओवीसाठी तिच्या आईची शेवटची आठवण होती, हे सांगते. उमाचं बोलणं ऐकून आता श्रीनूला देखील वाईट वाटत आहे. मात्र, आता ओवी काय करणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.






