
संध्या आपल्या मुलीची अर्थात ओवीची जबाबदारी मोठी बहीण उमा हिच्यावर सोपवली आहे. कॅन्सरशी झुंजत असलेल्या संध्याचं निधन झालं आहे. तिच्या माघारी ओवी ही आपली जबाबदारी असल्याचं वाटून आता उमा तिला आपल्या घरी, कोकणातील गावी घेऊन आली आहे. मात्र, या रूढीवादी घरात आता जीव गुदमरायला लागला आहे. तिला या घरात आता वेगळेपण जाणवायला लागलं आहे. खोतांच्या घरात तसा मोठा गोतावळा आहे. मात्र, या गोतावळ्यात देखील ओवी एकाकी पडली आहे. यामुळे आता ओवी टोकाचा निर्णय घेणार आहे.






