Sara Kahi Tichyasathi : दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणू शकेल का उमा? अभिनेत्री खुशबू तावडे म्हणते…

0
18
Sara Kahi Tichyasathi : दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणू शकेल का उमा? अभिनेत्री खुशबू तावडे म्हणते…


का स्वीकारली ही मालिका?

या नव्या मालिकेतील भूमिकेला होकार का दिला, हे सांगताना अभिनेत्री खुशबू तावडे म्हणाली की, ‘मी आधीदेखील मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. पण, जेव्हा मला एखाद्या भूमिकेसाठी विचारणा होते, तेव्हा त्या भूमिकेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन वेगळा असतो. आपल्याला मालिकेत मुख्य भूमिका मिळते, तेव्हा आपण मालिकेतील केंद्रबिंदू असतो. मला ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली आणि कोणताही विचार न करता मी या मालिकेसाठी होकार दिला. या मालिकेची कथा ऐकली तेव्हा मला ती खूप रंजक वाटली. कारण, या मालिकेत दोन बहिणीचं नातं दाखवलं आहे. या सगळ्यात सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे माझी सख्खी बहीण तितिक्षासुद्धा झी मराठीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेमध्ये काम करत आहे.’



Source link