महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर बिनविरोध निवड करण्यात

0
4
महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर बिनविरोध निवड करण्यात

फलटणःमहाराष्ट्र खो-खो असोसिएशनची विशेष वार्षिक सर्वसाधारण सभा (चौवार्षिक निवडणूक कार्यक्रम-२०२४-२०२८) रविवार, दि. ७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी १२ वाजता शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे संपन्न झाली. या सभेत महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची चौवार्षिक निवडणूक कार्यक्रम २०२४-२०२८ यासाठी बालेवाडी, पुणे येथे विशेष सभा घेण्यात आली, यामध्ये महाराष्ट्र खो-खो असोसिएशन च्या अध्यक्षपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, उपाध्यक्षपदी आ. जितेंद्र आव्हाड, अनिकेत तटकरे, महेश गादेकर, अशोक पितळे, तर कार्याध्यक्षपदी सचिन गोडबोले, सरचिटणीस पदी डॉ. चंद्रजीत जाधव, खजिनदारपदी ॲड.गोविंद शर्मा, सहसचिव पदी डॉ. राजेश सोनवणे, डॉ. पवन पाटील, जयंशु पोळ, बाळासाहेब तोरसकर, सौ. वर्षा कच्छवा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.