Sanjay Singh : अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; दारू घोटाळ्यात खासदार संजय सिंह यांना अटक

0
15
Sanjay Singh : अरविंद केजरीवालांना मोठा धक्का; दारू घोटाळ्यात खासदार संजय सिंह यांना अटक


मद्य घोटाळ्याच्या प्रकरणात याआधी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर संजय सिंह हे ईडीच्या रडारवर होते. आज सकाळी ईडीनं संजय सिंह यांच्या घरी छापे टाकले होते. त्यामुळं गदारोळ सुरू झाला होता. दिवसभराच्या झाडाझडतीनंतर अखेर आज सिंह यांना अटक करण्यात आली. मनी लॉण्ड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांना अटक करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. उद्या, गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे.



Source link