
‘डबल इस्मार्ट’ हा संजय दत्तचा पहिला तेलुगू चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन धुरा पुरी जगन्नाध यांनी केले आहे. त्यांचा या पूर्वीचा ‘लायगर’ हा चित्रपट सुपर फ्लॉप ठरला होता. संजय दत्तने ‘केजीएफ चॅप्टर 2’ या सिनेमाच्या माध्यमातून कन्नड सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर त्याचा ‘लियो’ हा चित्रपट तामिळ भाषेतील आहे. या चित्रपटातून तो तामिळ चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे.








