Sana Khan: भर पार्टीत प्रेग्नंट सनाला पतीने खेचलं? अखेर अभिनेत्रीने स्वतः दिलं स्पष्टीकरण! म्हणाली…

0
21
Sana Khan: भर पार्टीत प्रेग्नंट सनाला पतीने खेचलं? अखेर अभिनेत्रीने स्वतः दिलं स्पष्टीकरण! म्हणाली…


सोशल मीडियावर झालेल्या ट्रोलिंगनंतर आता अभिनेत्री यावर स्पष्टीकरण दिले आहे. सना खान म्हणाली की, ‘मला माहित आहे की, हा व्हिडीओ पाहून अनेकांना विचित्र वाटलं असेल. पण, असं काही नाही. त्यावेळी आम्ही पार्टीतून बाहेर पडत होतो आणि आमचा आमच्या चालकाशी संपर्क होत नव्हता. गाडीचाही पत्ता नव्हता. आम्ही बराच वेळ वाट पाहिली. बराच वेळ उभं राहून आम्ही थकलो होतो. त्यावेळी मी देखील खूप अस्वस्थ झाले होते. त्यामुळे ते मला एखाद्या आरामदायी ठिकाणी घेऊन जात होते, जिथे मी पाणी पिऊ शकेन आणि मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकेन. त्यावेळी पापाराझींमुळे आम्हाला फार उशीर होऊ नये यासाठी मीच त्यांना घाई करायला सांगत होते.’



Source link