
मिळालेल्या माहितीनुसार समृद्धी महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. भरधाव कारने अवजड वाहनाला पाठिमागून जोरदार धडक दिली. संभाजीनगर येथील रहिवाशी असलेले राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात हे तिघे कारने शनिवारी रात्री ११ च्या सुमारास समृद्धी महामार्गाने जात होते. त्यांची कार ही दौलताबाद येथे आली असता, भरधाव वेगात असलेल्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांची कार ही समोर असलेल्या ट्रकला जाऊन धडकली. हा अपघात एवढा भीषण होता एकी कारच्या समोरील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला. यात राहुल आनंद निकम, शिवाजी वामनराव थोरात आणि अण्णा रामराव मालोदे हे तिघेही जागीच ठार झाले.







