
बंद काळात अशी असेल वाहतूक
समृद्धी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC-14) ते सावंगी इंटरचेंज (IC-16) दरम्यान समृद्धी महामार्गवरुन नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक, निधोना (जालना) इंटरचेंज IC-14 मधून बाहेर पडून निधोना एमआयडीसी मार्गे- राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना-छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६(छत्रपती संभाजीनगर) येथे समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. तर, समृद्धी महामार्गावरील शिर्डीकडून नागपूरकडे जाणारी वाहतूक ही सावंगी इंटरचेंज क्र. IC-16 (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडून वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुद्ध दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-14 या ठिकाणी समृद्धी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे वळवण्यात आली आहे.



