
भाजपचे ओडिसाचे उमेदवार संबित पाभा यांनी एका मुलाखती भगवान जगन्नाथांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्या चौफेर टीका झाली होती. त्यानंतर संबित पात्रा यांनी सोमवारी रात्री एक वाजता समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, आज महाप्रभू श्री जगन्नाथ यांच्याबद्दल बोलताना मी चुकीचं वक्तव्य बोलून गेलो.
Sambit Patra Remark : “भगवान जनन्नाथ हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भक्त आहेत”, असं वक्तव्य भाजपाचे प्रवक्ते आणि लोकसभेचे उमेदवार संबित पात्रा यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. पात्रांच्या वक्तव्यामुळे भाजपावर टीका होऊ लागली आहे. एका ओडिया वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पात्रा यांनी भगवान जगन्नाथांबद्दल हे वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पात्रांच्या या वक्तव्यामुळे विरोधक भाजपाला घेरण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.
भगवान जगन्नाथ यांचा पंतप्रधान मोदींचे भक्त उल्लेख
संबित पात्रा यांना भारतीय जनता पार्टीने पुरी या लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. दरम्यान, एका मुलाखतीत त्यांनी भगवान जगन्नाथ यांचा पंतप्रधान मोदींचे भक्त असा उल्लेख केला. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. त्यानंतर पात्रा यांनी आता माफी मागितली आहे. पात्रा म्हणाले, “मी तीन दिवसांचा उपवास करून पश्चाताप करणार आहे.”
संबित पात्रा यांनी सोमवारी (२० मे) रात्री एक वाजता समाजमाध्यमांवर एक व्हिडीओ शेअर केला.








