
एमआयएम पदाधिकाऱ्याने म्हटले की, भिडे यांचे पोलीस संरक्षण काढून त्यांना पाच मिनिटे आमच्या ताब्यात द्या, असेही वक्तव्य या पदाधिकाऱ्याने केले आहे. सोलापूर शहर जिल्हा एमआयएमच्या वतीने संभाजी भिडे यांच्याविरोधात आंदोलन केले गेले. भिडे यांच्या गांधी विरोधातील वक्तव्याच्या राज्यभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना त्यात एमआयएम पक्षाचीही भरपडली आहे. सोलापुरात रेल्वे स्थानकासमोरील गांधीजींच्या पुतळ्याला एमआयएमच्या वतीने दुग्धाभिषेक घालून अभिवादन करण्यात आले. नंतर संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली. यामध्ये पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.






