
समंथा रुथ प्रभू ही साऊथमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहे, जिचे चाहते जगभरात आहेत. जेव्हापासून अभिनेत्रीने चित्रपटांमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे, तेव्हापासून तिच्या चाहत्यांमध्ये दुःखाची लाट पसरली आहे. आपल्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी समंथा दीर्घ विश्रांती घेत आहे. या निर्णयाने अभिनेत्रीची टीम देखील खूपच भावूक झाली आहे. समंथाने नुकतेच ‘सिटाडेल’चे शूटिंग पूर्ण केले आहे. यावेळी तिने मेकर्सचे आभार मानत ही संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. तर, या पोस्टच्या शेवटला तिने, ‘आता पुढच्या वेळी परतून येईपर्यंत…’ असे म्हटले आहे.







