
सध्या सलमान खानला असे वाटतेय की, या धमकीकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल, तितके त्या व्यक्तीला वाटेल की, आपण आपले इप्सित साध्य केले आहे. जे व्हायचे ते होईल, असा त्याचा विश्वास आहे. सलमानला सशस्त्र रक्षकांशिवाय घराबाहेर पडू नये, असे देखील सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर सलमान खानच्या कुटुंबाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खान, वडील सलीम खान आणि आपल्या संपूर्ण कुटुंबासह राहतो. सलमानला धमकी मिळाल्यानंतर पोलिसांनी सलमान खानच्या संपूर्ण कुटुंबाला घराबाहेर पडण्यास मनाई केली आहे.