
प्रभास आणि श्रुती हासन स्टारर हा चित्रपट २ भागांमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्मात्यांनी ‘सालार’च्या पहिल्या भागाला ‘सीझफायर’ असे नाव दिले आहे. प्रभास आणि श्रुती व्यतिरिक्त या चित्रपटात टिनू आनंद आणि पृथ्वीराज सुकुमार यांच्याही प्रमुख भूमिका दिसणार आहेत. ‘सालार’ हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट २८ सप्टेंबर २०२३ रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.








