Sajid Khan: तीन वेळा दहावी नापास, तरुंगवास ते जॅकलिनसोबत नाते; जाणून घ्या साजिद खानविषयी

0
19
Sajid Khan: तीन वेळा दहावी नापास, तरुंगवास ते जॅकलिनसोबत नाते; जाणून घ्या साजिद खानविषयी


कॉलेजमध्ये असताना साजिदला एक रात्र तुरुंगात काढावी लागली होती. त्याने स्वत: एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. रात्री मित्रांबरोबर चित्रपट पाहिल्यानंतर तो रेल्वे रुळावरून चालत घरी येत होता. तेव्हा पोलिसांनी त्यांना पकडले आणि एक रात्र जेलमध्ये ठेवले होते. त्यानंतर साजिदने करिअरला सुरुवात केली होती. सुरुवातीला तो टेलिव्हजनवरील एका शोचे सूत्रसंचालन करत होता. कधीकधी पार्ट्यांमध्ये डीजे वाजवून पैसे कमवायचा. त्यानंतर हळूहळू साजिद बॉलिवूड इंडस्ट्रीकडे वळला. २००६ साली त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘डरना जरुरी है’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यानंतर ‘हे बेबी’, ‘हाऊसफुल’, ‘हाऊसफुल २’ चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले होते. परंतु, ‘हिम्मतवाला’ आणि ‘हमशकल्स’ या चित्रपटांमुळे त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली.



Source link