
Saif Ali Khan Birthday Special: सैफ अली खान अशा बॉलिवूड अभिनेत्यांपैकी एक आहे, ज्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीत साकारलेल्या भूमिकांवर आणि पात्रांवर खूप प्रयोग केले. इतकंच काय, तर आताही हे प्रयोग करताना दिसत आहे. असे प्रयोग करताना आणि वेगवेगळ्या भूमिका साकारताना त्याने केलेल्या गोष्टी या अजिबात सोप्या नाहीत. कारण, एकदा निर्माण झालेली प्रतिमा यामुळे मोडण्याची भीती असते. मात्र, सैफच्या अभिनय कारकिर्दीत असे अनेक वेळा झाले, जेव्हा त्याने त्याच्या पात्र निवडीने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. यातील काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाले नसतील, परंतु सैफ अली खानच्या अभिनयाची सर्वांनी प्रशंसा केली. सैफच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्या काही गाजलेल्या पात्रांबद्दल…