
आईसोबत सहा महिने राहाते सई
सई वर्षातून केवळ सहा महिने आईसोबत असते किंवा कधीकधी त्यापेक्षाही कमी वेळ तिला आईसोबत घालवायला मिळतो. याविषयी बोलताना सई एका मुलाखतीमध्ये म्हणाली की, ‘आमचं एकमेकींवर खूप प्रेम आहे. पण आम्ही फार एकमेकींसोबत राहात नाही. मी आम्हा दोघींना तलवारीची उपमा देईन. जशा एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. तसेच आम्ही दोघी एकाच घरात एकत्र राहू शकत नाही. आम्ही सहा महिने एकत्र राहातो आणि सहा महिने वेगळे राहातो. पण या तलवारींनी लढलेल्या लढाया आणि तो प्रवास आज ही माझ्या दृष्टीवे खूप मोठा आहे. मी अनेक लढाया जिंकून इथपर्यंत पोहोचली आहे.’
वाचा: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने रिसेप्शनला नेसली लाल रंगाची साडी, किंमत ऐकून बसेल धक्का







