
Sai Lokur Become Mother: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूर नुकतीच आई झाली आहे. सई लोकूर हिने मुलीला जन्म दिला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून चाहते आणि सईसह सगळेच बाळाची आतुरतेने वाट बघत होते. या आनंदाच्या बातमीची सगळे खूप वाट बघत होते. नुकतीच एक सोशल मीडिया पोस्ट लिहून अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. मराठी बिग बॉस या शोमधून सई लोकूर घराघरांत पोहोचली होती. या शोने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली होती. या शोमधून सई सगळ्यांचीच लाडकी बनली होती.








