Sahir Ludhianvi Death Anniversary: प्रेमाची बहार अन् क्रांतीचा एल्गार जगाला दाखवणारे साहिर लुधियानवी! वाचा….

0
15
Sahir Ludhianvi Death Anniversary: प्रेमाची बहार अन् क्रांतीचा एल्गार जगाला दाखवणारे साहिर लुधियानवी! वाचा….


साहिर लुधियानवी यांचा जन्म ८ मार्च १९२१ रोजी पंजाब प्रांतातील लुधियानाजवळील एका गावात झाला होता. अब्दुल हाय हे त्यांचे खरे नाव होते. मात्र, लुधियानात जन्म झाल्यामुळे त्यांनी नंतर साहिर लुधियानवी हे टोपणनाव धारण केले. साहिर यांचा जन्म एका श्रीमंत घराण्यात झाला होता. त्यांचे वडील जमीनदार होते. त्यांचे अनेक विवाह झाले होते. साहिर हे त्यांच्या अकराव्य पत्नीचे अपत्य होते. मात्र, साहिर यांच्या आईने जेव्हा त्यांच्या वडिलांची साथ सोडण्याचा निर्णय घेतल्याने, त्यांचे बालपण अतिशय गरिबीत गेले. मात्र, साहिर हे त्यांच्या घरातील एकमेव पुत्र होते. त्यामुळे त्यांची कस्टडी मिळावी म्हणून त्यांच्या वडिलांनी खटला लढवला. पण, जेव्हा ८ वर्षांच्या साहिरने न्यायालयात साक्ष दिली की, त्याला त्याच्या आईसोबत राहायचे आहे, तेव्हा न्यायालयाने लहानग्या साहिरचा ताबा त्याच्या आईला दिला.



Source link