
एसएस राजामौली यांनी आपल्या प्रेमापुढे कशाचाही विचार केला नाही आणि रमा यांना लग्नासाठी मागणी घातली. राजामौली यांनी रमा यांच्या मुलाला म्हणजेच मुलगा एस.एस.कार्तिकेय याला आपले नाव दिले. इतकेच नाही तर, त्यांनी एक मुलगीही दत्तक घेतली. एस.एस. राजामौली यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, त्यांनी आतापर्यंत ११ चित्रपट केले आहेत आणि त्यातील एकही चित्रपट फ्लॉप झालेला नाही. त्याच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. त्यांच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये ‘साई’, ‘छत्रपती’, ‘विक्रमारुकुडू’, ‘यमडोंगा’, ‘मगधीरा’, ‘मरयदा रामन्ना’, ‘एगा’, ‘बाहुबली’, ‘आरआरआर’ यांचा समावेश आहे.






