Russia Dam Burst | कझाकस्तान सीमेजवळ धरण फुटलं, अनेक घरे उद्ध्वस्त, 4500 हून अधिक लोकांची सुटका! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
19
Russia Dam Burst  | कझाकस्तान सीमेजवळ धरण फुटलं, अनेक घरे उद्ध्वस्त, 4500 हून अधिक लोकांची सुटका! | Navarashtra (नवराष्ट्र)


कझाकस्तान सीमेजवळ धरण फुटलं, अनेक घरे उद्ध्वस्त, 4500 हून अधिक लोकांची सुटका!

रशियातील कझाकिस्तान सीमेजवळील धरण फुटल्याने उरल नदीला पूर आल्याने हजारो घरे पाण्याखाली गेली आहेत. टीम मदत आणि बचाव कार्य करत आहे. आता जवळपास 4500 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे.

रशियामधून एक मोठी बातमी समोर येत आहे. रशियामध्ये कझाकस्तान सीमेजवळील धरण फुटल्याने (Russia Dam Burst ) आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. रशियातील अनेक गावांमध्ये धरणाचे पाणी पसरल्याने घरे उद्ध्वस्त झाली आहेत. पुरामुळे दक्षिण उरल्सच्या ओरेनबर्ग भागातील संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे.  आता बचाव पथकाने या परिसरातून 4500 लोकांना बाहेर काढले आहे. बचावकार्य अजूनही सुरू आहे

हे सुद्धा वाचा






Source link